आमची गोष्ट
नमस्कार. आमच्या साकव नैसर्गिक शेतीचा (मुं पो. आळसंद, ता. खानापूर, जि. सांगली) प्रवास/सुरुवात थोडक्यात मांडायचा प्रयत्न करते. (दि. 6 ऑगस्ट 2024) मी पल्लवी, नवरा विट्ठल, आणि दोन मुली सई आणि स्वस्ति. मी आणि विट्ठल दोघेही कॉम्प्युटर आणि मेकॅनिकल इंजिनीयर. सईने इतक्यातच गणित ऑलिंपियाड मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून युरोपियन गर्ल्स मैथ ऑलिंपियाड मध्ये कांस्य पदक मिळवले आहे, मानाची 'स्पिरिट ऑफ रामानुजन' फेलोशिप मागची तीन वर्षे तिला मिळाली आहे. धाकटी ही इन्फोर्मेटिक्स ऑलिंपियाड साठी तयारी करतानाच क्रोशा, व्हिडीयो एडिटिंग इ. गोष्टींमध्ये रस दाखवते आहे. हा झाला भौतिक प्रवास. विट्ठलने सुभाष पाळेकरांचे आठवडाभराचे शेतीचे शिबिर केले. याच दरम्यान राजीव दिक्षीतांचे काही ऑडियो, अशा बर्याच घडामोडी घडत असतानाच मोठ़्या मुलीचा जन्म झाला. स्वतःच्या घरात, स्वयंपाकघरात खूप बदल आवश्यक आहेत हे लक्षात येऊ लागलं. विट्ठलने शेव्हिंग क्रीम आणि टूथ पेस्ट पूर्ण बंद केली. हे काही आपल्याला जमणार नाही असं म्हणता म्हणता कधी घरातले साबण, शाम्पू, क्लीनर, टूथ पेस्ट बंद झाले तेही समजलं नाही. हळूहळू भांडी घासण्याचे...